Tiranga Times Maharashtra
बांग्लादेश प्रीमियर लीग (BPL) 2026 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ही धक्कादायक बातमी बांग्लादेश क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे, कारण लीगची सुरुवात होण्यापूर्वीच खेळाडूंनी बहिष्कार जाहीर केला होता.
लीग स्पर्धेत 15 जानेवारी 2026 रोजी चटगांव रॉयल्स आणि नोआखाली एक्स्प्रेस यांच्यात सामना होणार होता, मात्र दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले नाहीत. हा बहिष्कार बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या फायनान्स कमिटी चेअरमन नजमुल इस्लाम यांच्या वादग्रस्त विधानांनंतर सुरू झाला. त्यांच्या विधानावर खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली आणि आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे लीग स्पर्धा स्थगित करावी लागली.
